१२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका मंगळवारी जाहीर
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. 🗳️

Saam TV News
71.1K views • Dec 28, 2025

About this video
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर येत आहे. येत्या मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाकडून १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात पार पडतील. दुसरीकडे, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका मात्र लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जातील. नंदुरबार, पालघर, नाशिक यांसारख्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याने तिथे सध्या निवडणूक जाहीर होणार नाही. मात्र, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये जिथे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत आहे, तिथे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
#ZillaParishad #MaharashtraElections #OBCReservation #SupremeCourt #ElectionCommission #MarathiNews #SaamTV #PanchayatSamiti #MaharashtraPolitics #LocalElections #Pune #Nashik #Kolhapur #PoliticalNews #ElectionUpdate
#ZillaParishad #MaharashtraElections #OBCReservation #SupremeCourt #ElectionCommission #MarathiNews #SaamTV #PanchayatSamiti #MaharashtraPolitics #LocalElections #Pune #Nashik #Kolhapur #PoliticalNews #ElectionUpdate
Tags and Topics
Browse our collection to discover more content in these categories.
Video Information
Views
71.1K
Likes
325
Duration
2:01
Published
Dec 28, 2025
User Reviews
4.1
(14) Related Trending Topics
LIVE TRENDSRelated trending topics. Click any trend to explore more videos.