Karan Johar यांच्या आगामी चित्रपट , पहा हा व्हिडिओ | Karan Johar Latest Update
‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ या चित्रपटाच्या सिक्वलचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. करण जोहरने सोशल मीडियावरुन या चित्रपटाचा पोस्टर सर्वांच्या भेटीला आणला...
🔥 Related Trending Topics
LIVE TRENDSThis video may be related to current global trending topics. Click any trend to explore more videos about what's hot right now!
THIS VIDEO IS TRENDING!
This video is currently trending in Singapore under the topic 'itoto system 12'.
About this video
‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ या चित्रपटाच्या सिक्वलचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. करण जोहरने सोशल मीडियावरुन या चित्रपटाचा पोस्टर सर्वांच्या भेटीला आणला असून, तरूणींच्या गळ्यातील ताईत असणारा अभिनेता टायगर श्रॉफ या पोस्टरवर पाहायला मिळतो. ‘स्टुडण्ट ऑफ द इयर 2 ’च्या या पोस्टरवर एका बॅचवर चित्रपटाचे नाव दिसत असून, सध्याच्या विद्यार्थ्यांच्या कलानेच या पोस्टरचे डिझाईन करण्यात आले आहे. ‘अॅडमिशन्स ओपन’, असेही या पोस्टरवर लिहिण्यात आले असून, ते शब्द अनेकांचे लक्ष वेधत आहेत. करणच्या या नव्या ‘स्टुडण्ट’च्या चर्चा सध्या सोशल मीडियावरही सुरु झाल्या आहेत, त्यासोबतच #StudentOfTheYear 2 हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आला आहे. ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन पुनित मल्होत्रा करणार असून, लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरूवात होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटातून अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे बॉलिवूड विश्वात पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर, टायगरची प्रेयसी अभिनेत्री दिशा पटानीच्या नावालाही प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे आता या चित्रपटासाठी कोणाची वर्णी लागणार याविषयीची उत्सुकता पाहायला मिळते आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Video Information
Views
90
Total views since publication
Duration
1:27
Video length
Published
Sep 13, 2021
Release date